वाराणसीत बाबा जयगुरुदेव यांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, 24 ठार

October 15, 2016 7:16 PM0 commentsViews:

varansi3315 ऑक्टोबर : वाराणासीत बाबा जय गुरूदेव यांच्या सभेसाठी जमलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झालीय. या चेंगराचेंगरीत 24 भाविकांना आपला जीव गमवावा लागलाय. यात 15 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. 5 भाविकांची प्रकृती गंभीर आहे. जखमी व्यक्तींवर नजीकच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

चंदौली आणि वाराणसीमधील राजघाट पुलावर जय गुरुदेव समर्थक कार्यक्रमात भाविकांनी गर्दी केली होती. कार्यक्रमस्थळाकडे जात असताना अचानक चेंगराचेंगरी झाली. ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी कार्यक्रमस्थाळाकडे जाणारा एकच मार्ग होता. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. वाराणसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उष्णता आणि श्वसनचा त्रास झाल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. तब्बल 3 तासांपासून भाविक गर्दीमध्ये अडकले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढावला. चेंगराचेंगरीमुळे कुणाचा मृत्यू झाला नाही असा दावा पोलिसांनी केलाय. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रूपयांची मदत जाहीर केलीय. पणजीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा