भारत-रशिया दरम्यान 16 महत्त्वपूर्ण करार

October 15, 2016 6:47 PM0 commentsViews:

modi_putinगोवा, 15 ऑक्टोबर : ब्रिक्स परिषदेत आज रशिया आणि भारतादरम्यान मैत्रीचं नातं आणखी घट्ट झालंय. दोन्ही देशामध्ये 16 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या करारनुसार रशिया भारताला अणुऊर्जा आणि रेल्वेसह 200 कमाव-का 226 हेलिकॉप्टर खरेदीचा करारावर स्वाक्षरी झाल्या आहे.

भारत, रशिया, ब्राझिल, चीन, नेपाळ आणि साऊथ आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या परिषदेला आज गोव्यात सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली. या भेटीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या चर्चेअंती काही महत्त्त्वाच्या करारांवर उभयतांनी स्वाक्षरी केली.

यात संरक्षण, व्यापार याबाबतचे ठराव संमत करण्यात आले. तर उरी हल्ल्याबाबत खेद व्यक्त करतानाच पुतीन यांनी दहशतवादाविरूद्ध एकत्रपणे लढायची तयारी दर्शवली. या भेटीत रशियाकडून 200 कमाव-का 226 हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी करण्यात आली. कुडनकोलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या तिस•या आणि चौथ्या प्लांटला गती देण्यासही मोदींनी अनुकुलता दाखवलीय. तर आंध्र प्रदेशात होणाऱ्या ‘स्मार्ट सिटी’त गुंतवणूक करायला रशियाने तयार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा