मोदींचा ठाम नकार

April 24, 2010 1:49 PM0 commentsViews: 1

24 एप्रिल

आयपीएलच्या कमिशनरपदाचा राजीनामा देण्यास ललित मोदी यांनी ठाम नकार दिला आहे.

माझ्यावर राजीनाम्यासाठी दबाव येत आहे. पण त्यांना ठामपणे सांगू इच्छितो की, मी राजीनामा देणार नाही, असे मोदींनी ट्विटरवर लिहिले आहे.

गेल्या चार वर्षात मी काय केले, हे सर्वांनाच माहिती आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान मुंबईत आज सहा तास झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत मोदींच्या राजीनाम्यावर जोरदार चर्चा झाली. बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते. आयपीएलच्या वादावर बेठकीत मोदींच्या राजीनाम्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होईल, असे म्हटले जात होते.

पण 26 तारखेच्या बैठकीतच याबाबतचा अंतिम निर्णय होईल, असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले.

दुसरीकडे ललित मोदी यांच्यावर आयपील कमिशनर पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत चालला आहे.खुद्द शरद पवारांनी मोदींना राजीनामा देण्याची सूचना केली आहे.

पण मला आणि आयपीएलला बदनाम करणार्‍यांची मी भांडेफोड करीन, अशा इशाराच मोदींनी दिला आहे. द

रम्यान मोदी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची अफवा पसरली होती. पण आपण हॉस्पिटलमध्ये नसल्याचा मोदींनीच ट्विटरवरून खुलासा केला आहे.

मोदींविरुद्ध फौजदारी तक्रार

ललित मोदी आणि त्यांच्या पत्नीविरुध्द राजस्थानात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात इतर 8 जणांविरुध्दही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राजस्थानमध्ये 2007मध्ये दोन हेरिटेज हवेली खरेदी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. काल रात्री मुख्य दंडाधिकार्‍याच्या कोर्टात ही तक्रार दाखल झाली. सोमवारी यावर सुनावणी होणार आहे.

close