दिवाळी आधी दिवाळं, पेट्रोल 1.34 तर डिझेल 2.37 रुपयांनी महागलं

October 15, 2016 8:29 PM0 commentsViews:

Petrol15 ऑक्टोबर : दिवाळी आधीच सर्व सामान्य ग्राहकांचं दिवाळं निघण्याची वेळ आलीये. ऑक्टोबर महिन्यात सलग तिसऱ्यांदा वाढ केलीये. आज पेट्रोलच्या दरात 1.34 आणि डिझेल 2.37 रुपयांनी महागलंय. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

अच्छे दिनचं स्वप्न दाखवणाऱ्या मोदी सरकारने सर्वसामन्याची पुन्हा एकदा निराशा केलीये. याआधी इंधन पुरवठादारांनी अनुदान वाढवण्यासाठी 3 ऑक्टोबरला पेट्रोलच्या दरात 14 पैसे तर डिझेल 10 पैशाने दरवाढ कऱण्यात आली होती. 1 ऑक्टोबरलाही पेट्रोल 37 पैसे तर डिझेल 8 पैशांने महागले होते. आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा