गुंडांच्या खांद्यावर भाजपचा झेंडा !

October 15, 2016 8:36 PM0 commentsViews:

वैभव सोनवणे, पुणे 15 ऑक्टोबर : पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गुंडांचं इनकमिंग जोरात सुरू आहे. बाबा बोडकेची भाजपशी सलगी सुरू आहे. तर तीन गुंडांनी या पूर्वीच भाजपचा झेंडा खांद्यावर घेतलाय.

pune_gunda_bjpसचिन ऊर्फ पप्पू घोलप,श्याम शिंदे आणि पिंट्या धाडवेही आहेत पुण्यातल्या कुख्यात गुंडांची नावं… पण आता या गुंडांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतलाय. गुंड बाबा बोडकेच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोटोमुळे राजकीय वर्तुळात वादळ उठलंय. पण पुण्यातल्या बाबा बोडके हा भाजपशी जवळीक साधणारा एकुलता एक गुंड नाही. तर अनेक गुंड भाजपच्या वळचणीला येऊ लागलेत. काही दिवसांपूर्वी या तीन गुंडांनी खासदार संजय काकडे यांच्या पुढाकारानं भाजपमध्ये प्रवेश केला. या गुंडांना प्रवेश देताना मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या चेह•यावर आनंदाचे भाव होते. ज्यांना भाजपमध्ये घेतलंय त्या गुंडांच्या नावावर गुन्ह्यांची लांबलचक यादी आहे.

सचिन उर्फ पप्पू घोलप याच्यावर खून खुनाचा प्रयत्न जाळपोळ दरोडा यासारख्या 5 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पिंट्या धाडवे याच्यावर खून खुनाचा प्रयत्न आणि बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. श्याम शिंदे याच्यावर पोलिसाला मारहाण दंगल माजवणे, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पक्षात गुंडांचा प्रवेश झाला असताना पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट मात्र पक्षात गुंडांना घेणार नसल्याचं छातीठोकपणं सांगतात. गुंड सत्ताधारी भाजपचे झेंडे खांद्यावर घेऊन फिरू लागल्यावर पुण्याची आणि राज्याची कायदासुव्यवस्था कशी नीट राहणार असा प्रश्न सामान्यांना पडलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा