बीडनंतर नांदेडमध्येही विविध मागण्यांसाठी दलित महामोर्चा

October 16, 2016 1:08 PM0 commentsViews:

NANDED MORCHA

16 ऑक्टोबर : बीड पाठोपठ आज नांदेडमध्ये दलित समाजाचा महामोर्चा काढण्यात आला आहे. या देशात अॅट्राॅसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, आधीचे आरक्षण अबाधित ठेवून मराठा, मुस्लीम आणि धनगर समाजांना आरक्षण देण्यात यावं, तसंच खैरलांजी ते कोपर्डीच्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी हा महामोर्चा काढण्यात आला आहे.

दलित समाजातील आठरा पगड जातीजमाती या निर्धार मोर्चामध्ये सामिल झालेत. नांदेडच्या या मोर्चाची गेल्या महिनाभरापासून तयारी सुरु होती. गाव वस्त्यांमध्ये जाऊन दलित समाजाला निर्धार मोर्चामध्ये सहभागी होण्याचं सर्व दलित नेते आवाहन केलं होतं.  मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आला आहे. तसंच मोर्चाच्या शेवटी, नेतृत्व करणार्‍या मुली मागण्यांचं निवेदन वाचतील असं आयोजकांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा