फोन टॅपिंगवरून विरोधक आक्रमक

April 26, 2010 8:51 AM0 commentsViews: 1

26 एप्रिल

फोन टॅपिंगच्या मुद्दयावरून लोकसभेत आज विरोधक आक्रमक झाले. याविषयी पंतप्रधानांनी निवेदन द्यावे, अशी मागणी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली.

तर अशा प्रकारच्या कोणत्याही फोन टॅपिंगला सरकारने परवानगी दिली नसल्याचे गृहमंत्री पी. चिदंबर यांनी स्पष्ट केले.

यूपीए सरकारने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. याप्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

फोन टॅपिंगच्या या गंभीर प्रकरणावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी अडवाणी यांनी लावून धरली आहे. या मुद्द्यावरून गोंधळ झाल्याने लोकसभा 2 वाजेपर्यत स्थगित करण्यात आली.

close