तळेगाव दाभाडेतील माजी नगराध्यक्षाची हत्या

October 16, 2016 3:39 PM0 commentsViews:

 Maval21312

पुणे – 16 ऑक्टोबर:  तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. दरम्यान, हल्ल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले आहेत.

तळेगाव दाभाडेतील माजी नगराध्यक्ष सचिन शेळके हे सकाळी घराबाहेर पडले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. धारदार हत्यारांनी वार केल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावर पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या शेळके यांना पवनामधील रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ झाली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर भाजपने मावळ बंदची हाक दिली आहे. सचिन शेळके यांच्यावर हल्ला कोणी केला, हल्ल्याचे नेमके कारण काय याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा