शाहरूखचा ‘अहमक’ जिओ मामिमध्ये

October 16, 2016 4:10 PM0 commentsViews:

srk-film-759

16 ऑक्टोबर: शाहरुखच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. जिओ मामी फेस्टिवलमध्ये शाहरूखचा अहमक हा सिनेमा दाखवला जाणार आहे. 90च्या दशकात बनलेला हा सिनेमा मामि फिल्म फेस्टिवलमध्ये प्रेक्षकांसाठी खास ट्रीट असेल.

शाहरूखचं करियर छोट्या पडद्यावरून सुरू झालंय. अहमक 1991मध्ये चार भागांमध्ये दूरदर्शनवर दाखवला होता. त्यानंतर 1992मध्ये न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये सिनेमाचं स्क्रीनिंग झालं होतं. फ्योदोर दोस्तोव्हस्कीच्या द इडियट या कादंबरीवर हा सिनेमा बेतलाय. पण हा सिनेमा काही थिएटर्समध्ये रिलीज झाला नव्हता. जिओ मामिच्या द न्यू मीडियम विभागात हा सिनेमा दाखवला जाणार आहे.

शाहरूख खाननं ट्विट करून ही बातमी दिली. 20 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबरपर्यंत जिओ मामि फिल्म फेस्टिवल रंगणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा