चेन्नई सुपर चॅम्पियन

April 26, 2010 8:58 AM0 commentsViews: 5

26 एप्रिल

महेंद्रसिंग धोणीची चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलची नवी चॅम्पियन टीम ठरली आहे.

आयपीएलच्या मेगाफायनलमध्ये चेन्नईने मुंबई इंडियन्सचा 22 रन्सने पराभव केला.

फायनल मॅचमध्ये अखेर महेंद्रसिंग धोणीने सचिन तेंडुलकरला धोबीपछाड दिली. 168 रन्सचे टार्गेट समोर ठेऊन खेळणार्‍या मुंबईने 9 विकेट गमावत 146 रन्स केले.

दुखापतीवर मात करत सचिनने 48 रन्सची एकाकी झुंज दिली. पण त्याला इतर बॅट्समनची साथ मिळाली नाही.

कायरन पोलार्डने 27 रन्सची तुफान खेळी करत मॅचमध्ये रंगत आणली खरी पण तो मुंबईला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. आणि अखेर स्पर्धेत 10 विजय मिळवत फायनल गाठणार्‍या मुंबईला फायनलमध्ये मात्र मात खावी लागली.

याआधी पहिली बॅटिंग करणार्‍या चेन्नईने 5 विकेट गमावत 168 रन्स केले. चेन्नईच्या विजयाचा हिरो ठरला तो नॉटआऊट हाफसेंच्युरी करणारा सुरेश रैना.

चेन्नईची टॉप ऑर्डरही आज झटपट आऊट झाली. पण सुरेश रैनाने दमदार बॅटिंग करत चेन्नईला मोठा स्कोअर उभा करून दिला. सुरेश रैनाने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला.

close