भारताच्या शेजारी दहशतवादाची जन्मभूमी – मोदी

October 16, 2016 7:21 PM0 commentsViews:

Narendra modi BRICS

16 ऑक्टोबर: दहशतवादाचा पुरवठा करणारा देश भारताचा शेजारी आहे. हा देश म्हणजे दहशतवादाची जन्मभूमीच आहे. तो फक्त दहशतवाद्यांना आसरा देत नाही, तर या देशाची विचारधारा, मानसिकताही दहशतवादीच आहे, असा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) गोव्यातील ब्रिक्स परिषदेत पाकिस्तानवर चढवला केलं.

आज आखाती देश, पश्चिम आशिया, युरोप आणि दक्षिण आशिया दहशतवादाच्या छायेखाली आहेत. तिथे नागरिकांच्या सुरक्षेचा आणि आर्थिक विकासाचा गहन प्रश्न निर्माण झालाय. भारतातील शांतता, सुरक्षा आणि विकासापुढेही दहशतवादाचं मोठं आव्हान आहे. दुर्दैवानं, दहशतवादाची जन्मभूमी भारताच्या शेजारीच आहे. जगभरातील दहशतवादी कारवाया या जन्मभूमीशी जोडलेल्या आहेत, अशी सणसणीत चपराक नरेंद्र मोदी यांनी पाकला नाव न घेता लगावली.

राजकीय फायद्यासाठी दहशतवादाचा वापर करणं योग्य आहे, ही त्यांची मानसिकता आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. ब्रिक्स राष्ट्रांनी एकत्र येऊन एका सुरात दहशतवादाविरोधात बोललं पाहिजे, लढलं पाहिजे, असं आवाहनही पंतप्रधान मोदींनी केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा