दिरंगाईचा कारभार! पावसाळ्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांना रेनकोटचं वाटप

October 16, 2016 8:25 PM0 commentsViews:

16 ऑक्टोबर:  वरातीमागून घोडे ही म्हण आदिवासी विकास विभागासाठी तंतोतंत खरी ठरली आहे. पावसाळा संपल्यावर आदिवासी विकास विभागानं आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना रेनकोटचं वाटप सुरु केलं आहे.

Rain coat31

पावसाळ्याच्या तोंडावर किंवा पावसाळा सुरू झाल्यावर रेनकोट मिळणं अपेक्षित होतं. पण पावसाळा संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांना रेनकोटचं वाटप सुरू झालं आहे. हिवाळ्याच्या तोंडावर स्वेटर द्या अशी मागणी विद्यार्थी करतायेत.

आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी पावसाळा कुठं संपलाय, असं अजब उत्तर दिलंय. हिवाळ्यात रेनकोटचं काय करायचं असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय.

पावसाळा संपल्यानंतर आणि थंडीच्या तोंडावर रेनकोट देणार्‍या आदिवासी विकास विभागाची अवस्था बैल मेला आणि झोपा केला अशी झालीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा