‘पॉवर ऑफ वुमन इम्पॅक्ट’मध्ये प्रियांका चोप्राचं नाव

October 16, 2016 8:50 PM0 commentsViews:

priyanka-chopra_1462015637_725x725

16 ऑक्टोबर: प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये फारच गाजतेय. आता या देसी गर्लचं नाव एका आंतरराष्ट्रीय मॅगझीनच्या ‘पॉवर ऑफ वुमन इम्पॅक्ट’ या यादीत समाविष्ट केलंय. या यादीत तिच्यासोबत ऑप्रा विन्फ्री, जेनिफर लोपेझ यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.

प्रियांका चोप्रानं आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवलाय. तिच्या हस्ते ऑस्कर पुरस्काराचं वितरण झालं. ऑस्करनंतर एमी ऍवॉर्डसलाही तिची उपस्थिती होती. अनेक परदेशी टॉक शोजमध्ये तिचा सहभाग असतो. क्वांटिको मालिकेच्या पहिल्या सिझननंतर प्रियांकाची आंतरराष्ट्रीय भरारी सुरूच राहिली. आता या मालिकेचा दुसरा सिझन सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा