मुंबईत माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या

October 17, 2016 8:47 AM0 commentsViews:

Bhupendra Veera

17 ऑक्टोबर :  मुंबईतील कलिनामध्ये एका 72 वर्षीय माहिती अधिकार कार्यकर्त्याची घरात घुसून गोळी झाडून हत्या करण्यात आली. शनिवारी रात्री ही घटना घडली असून हल्लेखोर अजूनही फरार आहे.

भूपेंद्र वीरा असं या माहिती अधिकार कार्यकर्त्याचं नाव असून त्यांची काही अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. वीरा हे कालिनामधल्या अनधिकृत बांधकामांविरोधात आवाज उठवायचे. शनिवारी सकाळीच ते पाठपुरावा करत असलेल्या एका प्रकरणात ते बांधकाम पाडण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले आणि त्याच रात्री त्यांची हत्या झाली.

दरम्यान, हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट असून ही हत्या भू-माफियाने केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याविरोधात कलिना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही पोलिसांनी अटक केली नाही. तर मारेकरांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा