…पण शिक्षा फक्त कलाकारालाच का?, प्रियांका चोप्राचा सवाल

October 17, 2016 12:28 PM0 commentsViews:

priyanka-chopra-mary-kom-press-conference-2014-toronto-film-festival_1

17 ऑक्टोबर: पाकिस्तानी कलाकारांवर अनेक वादविवाद होत असताना आता प्रियांका चोप्रानंही त्यात उडी घेतलीय. ‘मी देशप्रेमी आहे. प्रत्येक वेळी कलाकारांनाच लक्ष्य करणे चुकीचे आहे, असं तिने म्हटलं आहे.

‘देशामध्ये एखादा राजकीय वाद निर्माण झाला की कलाकारांना लक्ष्य केलं जातं. कोणाचंही वाईट व्हावं असं कलाकारांच्या मनात बिलकुल नसतं. असं असतानाही काही झालं की कलाकारांनाच सुळावर चढवलं जातं. हे साफ चुकीचं आहे. मीे कट्टर देशभक्त आहे. देशाच्या सुरक्षेसाठी सरकार जे ठरवेल ते करावंच लागेल. पण दरवेळी कलाकारच का? उद्योजक, डॉक्टर, राजकारणी यांना का नाही? ‘चेहरा’ असणाऱ्या कलाकारांना आणि सिनेसृष्टीलाच धारेवर धरले जाते.’ असं सडेतोड प्रश्न तिनं विचारला आहे.

त्यासोबतच, ‘मी टोकाची देशभक्त आहे. देशाच्या सुरक्षेसाठी माझं सरकार जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल. कलाकारांच्या मुद्द्यापेक्षा सुरक्षेचा मुद्द्यावर भर द्यायला हवा’, असंही प्रियांकाने स्पष्ट केलं आहे.

प्रियांका चोप्रा सध्या क्वांटिको 2 मालिकेच्या शूटिंगसाठी न्यूयॉर्कला आहे. त्यावेळी तिनं हे वक्तव्य केलं.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रियांकाच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रियांका चोप्रा दळभद्री आहे, आणि शहिदांच्या विधवा तिला धरून मारतील, असं सावंत म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close