न्यूयॉर्कमध्येही घुमला ‘#एकमराठालाखमराठा’चा एल्गार

October 17, 2016 1:52 PM0 commentsViews:

17 ऑक्टोबर:  संपूर्ण राज्य मराठा क्रांती मोर्चांनी ढवळून निघालं असताना आता मराठा समाजाची एक मराठा लाख मराठा गर्जना साता समुद्रापारही ऐकायला मिळालीय. न्यूयॉर्कमध्ये काल (रविवारी) #एकमराठालाखमराठाचा एल्गार घुमला. न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कनेक्टीकट या तीन राज्यातल्या मराठा बांधवांनी या मोर्चात उस्फुर्त सहभाग घेतला.

Ek maratha in Newyoirk

न्यूयॉर्क सिनेटर चक शुमर आणि बारताचे यू एन मधील दूत सईद अकबरुद्दीन यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही ईमेलद्वारे निवेदन पाठवण्यात आलं आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, कोलोरॅडो, विस्कॉन्सिन, वॉशिंग्टंन इथं मराठा मोर्चे निघणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा