जळगावात उष्माघाताचे तीन बळी

April 26, 2010 9:31 AM0 commentsViews:

26 एप्रिल

राज्यातील सर्वाधिक तापमानाची झळ सोसणार्‍या जळगावात एकाच दिवशी उष्माघाताचे तीन बळी गेले आहेत. यावल आणि पाचोरा या दोन तालुक्यात हे बळी गेले आहेत.

जळगाव जिल्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये उष्माघाताच्या पेशंटवर उपचार करण्यासाठी विशेष उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्समध्ये उष्माघाताच्या पेशंटची संख्या वाढत आहे.

मार्चमध्येच 43 अंशांवर गेलेला उन्हाचा पारा आता 47वर गेला आहे. उन्हापासून वाचण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासन करत आहे.

close