बाबा बोडके मुख्यमंत्र्यांना भेटलाच कसा ? -अजित पवार

October 17, 2016 4:04 PM0 commentsViews:

ajit_pawar3 17 ऑक्टोबर : पुण्यातला कुख्यात गुंड बाबा बोडके मुख्यमंत्र्यांना भेटलाच कसा ?, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केलाय. मुख्यमंत्री एकाप्रकारे बोडके बरोबरच्या फोटोचं लंगडं समर्थन करत असून निवडणुका जिंकण्यासाठी फडणवीस साम, दाम, दंड, भेद या रणनीतीचा वापर करत आहे असा आरोपही अजित पवारांनी केला.

4 खुनासह वेगवेगळे गुन्हे दाखल झालेल्या कुख्यात गुंड बाबा बोडकेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकला होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या फोटोवरुन भाजपवर सडकून टीका केली. लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांची परंपरा आज भाजपमध्ये राहिली नाही, अशी टीका अजित पवारांनी केली. ज्या माणसावर कलम 302 आणि मोक्कासारख्या कायद्यांअंतर्गत कारवाई झालीय, असा माणूस मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचूच कसा शकतो असा सवालही पवारांनी उपस्थिती केला. विशेष म्हणजे 2009 मध्ये राष्ट्रवादीनेच बाबा बोडकेला पक्षात प्रवेश दिला होता. खुद्द अजित पवारांच्या उपस्थिती बाबा बोडकेला प्रवेश देण्यात आला. त्यावर ‘वाल्याचा वाल्मिकी’ करू असं अजित पवार त्यावेळी म्हणाले होते. मीडियाच्या दबावामुळे बाबा बोडकेची नंतर हकालपट्टी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा