दीपिकाच्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाचं ट्रेलर दिमाखात लाँच

October 17, 2016 4:05 PM0 commentsViews:

Cu6MdfmUkAAv0ES

17 ऑक्टोबर: बिग बॉसच्या प्रीमियरला दीपिका पदुकोणच्या ‘XXX : द रिटर्न ऑफ जेंडर केज’च्या ट्रेलरचं लाँच मोठं दिमाखात झालं. दीपिका या सिनेमात ऍक्शन करतेय. दीपिका या सिनेमात शिकार्‍याच्या भूमिकेत आहे. हॉलिवूड अभिनेता विन डिझल आणि दीपिकाचा रोमान्सही या सिनेमात पाहायला मिळेल. दीपिकाचा हा पहिला हॉलिवूड सिनेमा.

ट्रेलरमध्ये दीपिका विन डिझलच्या पोटात पिस्तुल रोखताना दिसतेय. शिकारी आणि प्रेयसी अशा दोन्ही व्यक्तिरेखा ती साकारतेय.

‘XXX: द रिटर्न ऑफ जेंडर केज’ सिनेमात नीना डोबरेव आणि रुबी रोज यांच्याही भूमिका आहेत.नीना डोबरेवनं कॉमेडी टेक्निकल एक्सपर्ट उभी केलीय तर रुबी एका शूटरच्या भूमिकेत आहे. सिनेमाचा हिरो विन डिझल एनएसए एजंटची भूमिका करतोय. सिनेमाचं दिग्दर्शन डीजे करुसोनं केलंय. हा सिनेमा 20 जानेवारी 2017ला सगळीकडे रिलीज होईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा