पंकज भुजबळांवर भिरकावली वीट

April 26, 2010 12:46 PM0 commentsViews: 2

26 एप्रिल

मनमाड येथे एका उद्यानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात अज्ञात व्यक्तीने आमदार पंकज भुजबळ यांच्यावर वीट भिरकावली. सुदैवाने ते यातून थोडक्यात बचावले.

मात्र, त्यांचा शेजारी बसलेले माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांना ही वीट लागून ते जखमी झाले. त्यानंतर काही अज्ञात इसमांनी त्या उद्यानाची नासधूस केली.

राष्ट्रवादी काँग्रेसने या घटनेचा निषेध केला आहे. तर वीट फेकणार्‍याला अटक करावी, या मागणीसाठी आरपीआयने मनमाड बंदचा इशारा दिला आहे.

close