नागपूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधम अटकेत

October 17, 2016 4:43 PM0 commentsViews:

rape-victims-17 ऑक्टोबर : नागपुरच्या यशोधरानगरात एका पाच वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्यानं या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणातील 22 वर्षीय आरोपी मोहम्मद आसिफ निसार याला यशोधरा नगर पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणातील पीडित मुलीची आई एका नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी बाहेर गेली होती. बालवाडीत शिकणारी ही पीडित मुलगी घरी आल्यावर शेजारीच राहणाऱ्या आरोपी आसिफने या मुलीवर अत्याचार केला. पीडित मुलीने हा संपूर्ण घटनाक्रम आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी आसिफ हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे आणि परिसरातील महिलांना छेड काढण्याचं काम करत होता अशा तक्रारीही या घटनेनंतर पुढे आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा