राज ठाकरेही मनसे शाखांना देणार भेट

October 17, 2016 4:58 PM0 commentsViews:

raj_thackeryमुंबई, 17 ऑक्टोबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या पक्षाच्या शाखेला भेटी देणार आहे. राज ठाकरे यांनी वरळी शाखेपासून आज सुरुवात देखिल केलीये.

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी दिवाळीनंतर प्रत्येक शाखेत जाऊन भेट देणार अशी घोषणा केली होती. त्यांची ही घोषणा होत नाही तेच राज ठाकरे यांनीही शाखांना भेट देण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय. राज ठाकरे यांनी आज (सोमवारी) वरळी शाखेपासून भेट घेण्यास सुरुवात केलीये. आज वरळी, शिवडी आणि भायखळ्यात जाऊन राज ठाकरे शाखांचा आढावा घेणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं आतापासूनच कंबर कसायला सुरुवात केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close