आयपीएलची कागदपत्रे गहाळ

April 26, 2010 12:54 PM0 commentsViews:

26 एप्रिल

आयपीएलसंदर्भातील काही महत्वाची कागदपत्रे गहाळ झाली आहेत. आणि इन्कमटॅक्स विभागाकडून या कागदपत्रांची माहिती मागवण्यात आली आहे.

या गहाळ कागदपत्रांच्या तपासणीचे काम बीसीसीआयचे सीओओ रत्नाकर शेट्टी यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी सांगितले.

लक्ष्य आयपीएल 2011

बीसीसीआयने आता 2011 सालच्या आयपीएलवर लक्ष केंद्रीत केले आहे. आणि क्रिकेटर्सचे करार आणि त्यांच्या इतर प्रश्नांवर विचार करण्यासाठी तीन माजी क्रिकेटर्सची समिती नेमली आहे.

सुनील गावस्कर, रवी शास्त्री आणि मन्सूर अली खान पतौडी या समितीचे सदस्य असतील. आणि टीममध्ये परदेशी खेळाडू तसेच भारतीय खेळाडूंची संख्या आणि त्यांच्या समस्यांसाठी ते फ्रँचाईजींशी बोलतील.

समिती नक्की काय करणार?

सध्या प्रत्येक टीममध्ये चार परदेशी खेळाडू खेळू शकतात. पण काही फ्रँचाईजींना ही मर्यादा वाढवून हवी आहे.या मुद्दयावर माजी क्रिकेटर्सची ही समिती फ्रँचाईजी आणि क्रिकेटर्सशीही बोलणार आहे आणि दोघांमधला दुवा म्हणून समिती काम करणार आहे. फ्रँचाईजी आणि खेळाडूंच्या समस्या जाणून घेतल्यावर ही समिती आपला अहवाल बीसीसीआयला सादर करणार आहे.

close