रिकाम्या जागा भरा, विराटची गर्लफ्रेंड कोण ?

October 17, 2016 7:29 PM0 commentsViews:

17 ऑक्टोबर : परीक्षेत काय प्रश्न विचारला जाईल या प्रश्नांमुळेच विद्यार्थी अहोरात्र झटून अभ्यास करतात. पण जर तुम्हाला प्रश्नपत्रिकेत विराट कोहलीची गर्लफ्रेंड कोण ? असा प्रश्न विचारला गेला तर..? दचकू नका…असा प्रश्न खरोखरंच विचारला गेलाय.

bhivandi_schoolभिवंडी येथील चाचा नेहरु हिंदी हायस्कूल शाळेची वार्षिक परीक्षा नुकतीच पार पडली. नववीच्या शारिरीक शिक्षण या विषयात रिकाम्या जागा भरा या विभागात चक्क ‘विराटची गर्लफ्रेंड कोण ?’ असा प्रश्न विचारण्यात आला. सोबत तीन पर्यायही देण्यात आले. या पर्यायात प्रियांका, अनुष्का आणि दीपिका या तीन अभिनेत्रींची नावे देण्यात आली होती. विशेष म्हणजे शारिरीक शिक्षण विषयाची परीक्षा असल्यामुळे क्रीडा जगताची प्रश्न येणे हे अपेक्षित होतं. पण खेळाडूच्या खासगी आयुष्यातील प्रश्न आल्यामुळे विद्याथीर्ही बुचकळ्यात पडले. पण, परीक्षा असल्यामुळे मुकाट्यानं विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवावी लागली.

ही प्रश्नपत्रिका व्हॉयरल झाल्यानंतर आपल्याकडून झालेलेही ही घोडचूक शाळा प्रशासनाने मान्य केली आहे. भिवंडीतील हिंदीमाध्यमाची 50 वर्षे जुनी शाळा आहे. शाळेमध्ये पीटीला शिक्षक नसल्याने हिंदी विषय शिकवणारा शिक्षकानेच शारिरीक शिक्षणाची प्रश्नपत्रिका तयार केली असा खुलासा शाळेनं केला. एवढंच नाहीतर ही प्रश्नपत्रिका आधी तपासून घेतली नाही त्यामुळे हा घोळ झाला असंही स्पष्ट केलं. अखेर या प्रकरणी संबंधीत शिक्षकावर कारवाईचं आश्वासन शाळेनं दिलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close