मोदींवर 22 आरोप

April 26, 2010 1:12 PM0 commentsViews:

26 एप्रिल

ललित मोदींना रविवारीच निलंबित केल्याने आजच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत मोदींवर चर्चा झाली नाही, असे बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी सांगितले. बीसीसीआयने मोदींवर एकूण 22 आरोप ठेवले आहेत.

हे आरोप पुढीलप्रमाणे –

दोन नव्या फ्रँचाईजींसाठीच्या लिलावाची प्रक्रिया सदोष असल्याचा मोदींवर ठपका

फ्रँचाईजींशी संगनमताने लिलावाच्या बोली आधीच ठरवल्याचा आरोप

800 लाख अमेरिकन डॉलर्सच्या फॅसिलिटेशन फीबद्दल बीसीसीआयला अंधारात ठेवल्याचा आरोप

कोची टीमवर बोली मागे घेण्यासाठी मोदींनी दबाव टाकल्याचा आरोप

मोदी यांची वागणूक बेशिस्त असून बीसीसीआय अधिकार्‍यांवरही त्यांची नाहक शेरेबाजी

तीन आयपीएल टीममधील गुंतवणूक मोदींनी लपवली

आयपीएलमध्ये आर्थिक गैरव्यवहार तसेच प्रक्षेपण आणि इंटरनेट हक्क विकताना मोदींनी काही जणांवर मेहरनजर केली

राजस्थान रॉयल्स टीममधील घोटाळ्याकडे दुर्लक्ष

कोची टीमचे मालकी हक्क उघड करताना गोपनियता नियमांचे उल्लंघन

पवार कुटुंबाला क्लीन चिट

आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत केंदि्रय मंत्री शरद पवार किंवा त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणाचाही सहभाग नसल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी स्पष्ट केले आहे.

close