दिवाळीमध्ये एसटीचा प्रवास 20 टक्क्यांनी महागणार !

October 17, 2016 11:09 PM0 commentsViews:

 ST_Bus.image

17 ऑक्टोबर : दिवाळी जशी जवळ येतेय तसं सामान्यांच्या खिशाला यंदा चाट बसणार अशी चिन्हं दिसायला लागली आहेत. यंदा दिवाळीमध्ये गरिब रथ समजल्या जाणाऱ्या लालपरी अर्था एसटी बसच्या तिकीटांमध्ये 20 टक्के दरवाढ होणार आहे, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी तशी घोषणा केलीये.

यंदा दिवाळीत एसटीच्या 600 जास्त बसेस सोडल्या जाणार आहेत पण साध्या आणि निमआराम गाड्यांसाठी 10 टक्के आणि शिवनेरी सेवेसाठी 20 टक्के जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. यावर्षी 16 दिवस ही भाडेवाढ राहणार आहे. याशिवाय खाजगी वाहनधारकांना पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतींचा सामना करावा लागणार आहे. पेट्रोलचे दर 1 रू 34 पैसे तर डिझेलचे दर 2 रूपये 37 पैशांनी वाढलेत. जरी 16 दिवसांसाठी ही दरवाढ असली तरी नेमका दिवाळीच्या सणावर याचा बोजा एसटीने प्रवास करणाऱ्यांवर पडणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा