अमेरिकन पदार्थांची गोडी आता वरळीतही!

October 18, 2016 12:05 AM0 commentsViews:

18 ऑक्टोबर : तुम्हाला परदेशी पदार्थांची विशेषतः अमेरिकन खाद्य पदार्थांची आवड असेल तर त्यासाठी थेट अमेरिकेत जाऊन खाण्याची किंवा कुणाकडून तरी मागवून घेण्याची गरज नाही. कारण मुंबईच्या वरळी परिसरातील पॅलेडियमच्या फुडमॉलमध्ये अमेरिकन खाद्य पदार्थांचं आउटलेट सुरू झालं आहे.

अमेरिकेच्या कृषी सह सचिव एलेक्सीस टेलर यांच्या हस्ते या आऊटलेटचं उद्धाटन करण्यात आलं. यावेळी अमेरिकेचे काऊंसल जनरल टॉम वायदा ही उपस्थित होते. या आऊटलेटचं उद्धाटन सुद्धा विशेष पद्धतीनं करण्यात आलं. दोन्ही पाहुण्यांनी काही पदार्थ स्वतः बनवून चाखले.

या आउटलेटला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा पाहुण्यांनी व्यक्त केलीये. शिवाय अशा उपक्रमांमुळे दोन्ही देशातल्या खाद्य संस्कृतीची देवाणघेवाण होईल असं मत ही व्यक्त केलं. या आउटलेटमधे भारतीय ऑणि अमेरिकन अशा दोन्ही देशातल्या पदार्थांची ,धान्यांची, चॉकलेटस्, कँडीज् यांची रैलचैल असणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close