मुंबईत कफ परेडमधील आगीत दोघांचा होरपळून मृत्यू

October 18, 2016 9:08 AM0 commentsViews:

cuffe parade in fire

18 ऑक्टोबर : दक्षिण मुंबईतील कफ परेड इथल्या मेकर टॉवरच्या २०व्या मजल्यावर लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास इमारतीतून धुराचे लोट उठल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलानं प्रयत्नांची शर्थ करून 11 जणांना सुखरूप बाहेर काढलं आणि आगही आटोक्यात आणली; पण दोन जणांचा बळी गेला आहे.

मेकर टॉवरमध्ये 8 बीएचकेच्या ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये  बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज त्यांच्या कुटुंबासह राहतात. आग लागली तेव्हा शेखर बजाज, त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा, सून आणि एक वर्षांचा नातू फ्लॅटमध्ये अडकले होते. पण सुदैवानं त्यांचं संपूर्ण कुटुंब या आगीतून बचावलं आहे.

मेकर टॉवरमध्ये आग लागल्याचं कळताच अग्निशमन दलाचे 8 गाड्या घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत आगी संपूर्ण 20व्या मजल्यावर पसरली होती. त्यामुळे विशेष शिडीच्या मदतीनं जवानांनी आग विझवण्याचं काम सुरू केलं. त्यासोबतच एका पथकानं रहिवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. 3 अॅम्ब्युलन्सही घटनास्थळी पोहोचल्या. साधारण दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. पण, या आगीत दोघांचा मृत्यू झाला. आगाची कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close