राज्यात खरी गरज आहे ती जिभांना लगाम घालण्याची – उद्धव ठाकरे

October 18, 2016 11:53 AM0 commentsViews:

shivsena uddhav

18 ऑक्टोबर :  ‘आज पैसेवाल्यांची आंदोलनं यशस्वी होत आहेत’, असं खळबळजनक वक्तव्य करणारे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. ‘महाराष्ट्राल सध्या खरी गरज आहे ती जिभांना लगाम घालण्याची. कारण त्या जेवढ्या सैल तेवढा सामाजिक सलोखा बिघडण्याचा धोका जास्त असतो’ अशा शब्दांत उद्धव यांनी बडोले यांच्यावर ‘सामना’च्या अग्रलेखातून निशाणा साधला आहे. फक्त पैसे खर्च केल्यानेच आक्रोशाला तोंड फुटते हे आम्हाला मान्य नाही असंही त्यांनी नमूद केलं आहे.

बडोलेंच्या वक्तव्याचा राज्यभरातील जनता निषेध करत असून बडोले यांना महाराष्ट्रातूनच हाकलून देण्यात यावं अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरात व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर उद्धव यांनी बडोले यांचा समाचार घेत सर्व नेत्यांना जीभेवर ताबा ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

‘पैसेवाल्यांच्या मोर्चालाच गर्दी होते असं म्हटलं तर उत्तर प्रदेशात सध्या अमित शहांच्या सभांना होणारी गर्दीही भाडोत्री मानायची का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना येणाऱ्यांवर कोणते मायाजाल फेकले जाते? याचाही खुलासा करा,’ असा टोला  उद्धव ठाकरेंनी मराठा मोर्चावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बडोले यांनी केला आहे. तसंच ‘ महाराष्ट्रात नवी राजकीय घडी बसल्यापासून राज्याची सामाजिक घडी विस्कटली आहे ‘ अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.

त्याचबरोबर, ‘मराठा समाजाचे मोर्चे यशस्वी होतात याचे मुख्य कारण पैसा नसून शिस्त, माध्यमांचा नेटका वापर, यंत्रणा राबवणारा हात आणि मुख्य म्हणजे मनात उसळलेला संताप ‘ असल्याचंही उद्धव यांनी म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close