ठाण्यात शिवसेनेला खिंडार, शेकडो शिवसैनिक मनसेच्या वाटेवर

October 18, 2016 1:41 PM0 commentsViews:

Uddhav and Raj2312

18 ऑक्टोबर :  शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठाण्यातील हजारो शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन तोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेला येत्या निवडणुकीत मोठा धक्का पोहचण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते थोड्याच वेळात कृष्णकुंजवर मनसेमध्ये प्रवेश घेणार आहेत. ठाण्याचे शहर प्रमुख अविनाश जाधव यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कळवा-दिव्यातील 90 टक्क्यांहून जास्त कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे.

कळवा-दिव्यातील 90 टक्क्यांहून जास्त कार्यकर्त्यांचा यात समावेश असणार आहे. त्यामुळे सेनेच्या या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनसे प्रवेशावरुन सेनेला मोठे भगदाड पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

नाशकात मनसे, राष्ट्रवादीला धक्का, तीन नगरसेवक शिवसेनेत

तर दुसरीकडे नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसे नगरसेवक अशोक सातभाई आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवाजी चुंबळे आणि कल्पना चुंबळे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थीतीत मातोश्रीवर प्रवेश घेत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा