पुण्यातल्या कोथरुडमध्ये 31 वर्षांच्या महिलेची भर रस्त्यात हत्या

October 18, 2016 10:44 AM0 commentsViews:

Shubhanhi3211jpg

18 ऑक्टोबर :  पुण्यातल्या कोथरूडमधील राहुलनगर येथील बंधन सोसायटीजवळ कामाला जात असलेल्या महिलेच्या डोक्यात वार करून तिची हत्या करण्यात आला आहे. शुभांगी खटावकर असं या महिलेचं नाव असून ती 31 वर्षांची आहे.

शुभांगी आपल्या दुचाकीवरून सकाळी कामाला जात असताना हल्लेखोराने तिच्या डोक्यात वार करून तिचा खून केला आणि तिची दुचाकी घेऊन पळून गेला. पहाटे सुमारे 5.30 वाजता हि घटना घडली.

हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट असून प्रेमसंबंधातून हा खून असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.  या घटनेचा पुढील तपास कोथरुड पोलिस करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा