ऐन दिवाळीच्या तोंडावर डाळदर वाढल्यानं बजेट पुन्हा कोलमडलं

October 18, 2016 3:50 PM0 commentsViews:

htmetro_feefef44-9538-11e5-b13b-1ee01ddf34ff

18 ऑक्टोबर :  डाळ दर नियंत्रण कायदा हा केंद्र सरकारनं राज्य सरकारला परत पाठवला आहे. एका अर्थानं हे बरंच झालंय अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. कारण डाळ दर नियंत्रण कायदा हा शेतकरी विरोधी असल्याची टीका पहिल्यापासूनच आहे.

केंद्रानं राज्याच्या प्रस्तावित विधेयकातल्या चार ते पाच तरतुदींवर आक्षेप घेतला आहे. त्या तरतुदी कुठल्या हे समजू शकलेलं नाही पण दिवाळीच्या तोंडावर डाळ आणखी महागण्याची भीती व्यक्त केली जातेय. गेल्या वर्षी डाळ अचानक महागल्यामुळे सरकारनं डाळ दर नियंत्रण विधेयक आणलं. त्यानंतर ते केंद्राकडे पाठवलं. पण केंद्रानं तर परत राज्याकडे पाठवलं आहे.

डाळ ही शेतकर्‍यांमुळे नाही तर डाळ दुकानदारांच्या दलालीमुळे वाढल्याचा आरोपही शेतकर्‍यांकडून केला जातोय. डाळ दर नियंत्रण कायदा करण्याऐवजी दलालांचा बंदोबस्त करा अशी मागणीही केली जातेय. आताच शंभरीच्या वर असलेली तूर, चना डाळ आणखी महागणार असं दिसतंय.

दिवाळीच्या तोंडावर राज्यात चणा डाळीचे भाव कडाडले

– गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी चणा डाळ किमंत दुप्पट
– यावर्षी पण डाळीचे भाव नियंत्रण ठेवण्यात राज्य सरकारला अपयश
– चणा डाळीचे भाव दुपटीने वाढले असले तरी तूर डाळ, उडीद, मूग,मसूर या डाळीचे भावात मात्र निम्म्याने घट

मुंबई दर (प्रति क्विंटल रुपये)

डाळ           2015    2016

चणाडाळ      6,450   11,500
तूरडाळ        17,000  8750
उडीदडाळ  15,250    10,350
मूगडाळ        9,350    6650
मसूरडाळ    8,000     6450

नागपूर दर (प्रति क्विंटल रुपये)

डाळ           2015    2016

चणाडाळ    5,978      11,267
तूरडाळ      12,868     9400
उडीदडाळ  11,993    11,233
मूगडाळ      8,632      6,867
मसूरडाळ   7,542       6,367

पुणे दर (प्रति क्विंटल रुपये)

डाळ           2015    2016

चणाडाळ      5,500    11,917
तूरडाळ        12,833  10,800
उडीदडाळ   13,933  11,767
मूगडाळ        9,367    6,433
मसूरडाळ      6,567    6,617


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा