सरकार सोडणार आयपीएलच्या करावर पाणी

April 26, 2010 1:29 PM0 commentsViews: 1

26 एप्रिल

आयपीएलवर कर लावण्याच्या मुद्यावर सरकार अडचणीत आले असले तरी या कोट्यवधींच्या करावर सरकार पाणी सोडणार आहे.

मुख्यमंत्र्यांनीच तशी कबुली दिली आहे. आतापर्यंत झालेल्या आयपीएलच्या मॅचेसवर आता कर लावणे कठीण असून यापुढे असा कर लावण्याचा विचार होऊ शकतो, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

त्यामुळे सध्याच्या आयपीएलच्या कराचे कोट्यवधी रुपये सरकार सोडून देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या करावरून सरकारवर जोरदार टीका होत आहे. आयपीएललला करमाफी दिल्याने शिवसेनेनेही याचिका दाखल केली आहे.

close