नवी मुंबईत दिवाळी आधी फुटणार ‘फटाके’, 5 नगरसेवकांचं पद धोक्यात

October 18, 2016 5:36 PM0 commentsViews:

Navi Mumbai18 ऑक्टोबर : नवी मुंबई महापालिकेच्या आणखी पाच नगरसेवकांवर टांगती तलवार आहे. ऐन दिवाळीत या पाच नगरसेवकांचं पद रद्द होण्याची शक्यता आहे. दिघा अनधिकृत इमारत प्रकरणात यापूर्वी राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांवर टांगती तलवार होती. आता स्थायी समिती चे सभापती शिवराम पाटील आणि त्यांची पत्नी अनिता पाटील यांना नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी नोटीस बजावलीये.

मोठ्या मुश्किलीने स्थायी समिती सभापतीपदाची माळ राष्ट्रवादीच्या घशातून काढून शिवसेनेच्या हिश्याला आली. या सभापतीचे मानकरी ठरलेले शिवराम पाटील आणि त्यांची पत्नी अनिता पाटील यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणात महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नोटीस बजावलीय.  येत्या 21 तारखेला त्यावर सुनावणी होणार आहे. यासोबत शिवसेनेचे बहाद्दुर बिश्त आणि जगदीश गवते यांचं पदही धोक्यात आहे. याशिवाय भाजपचे नगसेवक दीपक पवार यांच्यावरही टांगती तलवार आहे. या दिवाळीतच नवी मुंबईत हे राजकीय फटाके वाजण्याची शक्यता आहे. याशिवाय आणखी 11 नगरसेवकांच्या नावाची यादी तयार झाल्याने नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात चिंतेचं वातावरण आहे. या आठ नगरसेवकांसोबत आणखीन 11 नगरसेवकांची नावांची यादी तयार झाल्याने नवी मुंबईच्या राजकीय वर्तृळात चिंतेच वातावरण आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा