कोपर्डी प्रकरणी बुधवारी सकाळी 11 वाजता सुनावणी

October 18, 2016 7:15 PM0 commentsViews:

kopardi_rape_Case318 ऑक्टोबर : कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणी आज पहिली सुनावणी झाली. आता उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.

आज जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी नितीननं वकील दिलाय तर भवाळ आणि शिंदेनं सरकारी वकीलासाठी अर्ज केलाय. त्याचबरोबर नितीन भैलुमे यानं जामीन आणि खटल्यातून मुक्त करण्यासाठी अर्ज केलाय. त्यावर पुरावा आणि साक्षीदारची माहिती घेऊन उद्या सुनावणी होणार आहे. तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या खटल्याची तातडीनं सुनावणी करण्याची सूचना सरकारनं दिल्याचं म्हटलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा