‘देव तारी…’ जन्मदात्याने बाळाला रेल्वे ट्रॅकवर ठेवलं, तरुणांनी वाचवलं

October 18, 2016 7:35 PM0 commentsViews:

18 ऑक्टोबर : देव तारी त्याला कोण मारी… या म्हणीचा प्रत्यय आज लोणावळा रेल्वे स्थानकावर आला. एका ‘नकोशी’ बाळाला जन्मदात्याने रेल्वेच्या ट्रॅकवर संपवण्यासाठी ठेवलं होतं. पण ऐनवेळेवर दोन तरुणांनी पोहचून या बाळाला जीवनदान दिलंय.

lonavala_newsसुहास साबळे आणि तेजस राईलकर असे या बाळाचे प्राण वाचविलेल्या दोन तरुणांचे नाव आहेत. सुहास आणि तेजस आज सकाळी जिमला जात होते. त्यावेळी त्यांना ज्या ठिकाणी ट्रॅक चेंज होतो त्याठिकाणी एक निळ्या रंगाची पिशवी दिसून आली. या पिशवीत तीन दिवसांचे बाळ ठेऊन पिशवीला गाठ मारु रेल्वे ट्रॅकवर ठेवली होती. त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी ती पिशवी उचलून घेतली. त्याचवेळी या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने जाणारी एक मालगाडी भरधाव वेगात निघून गेली.

त्यानंतर या दोघांनी ही पिशवी गेस्ट हाऊसजवळ आणून त्यात पाहिले असता त्यांना त्यात तीन दिवसांचे बाळ कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेले आढळून आले. या घटनेची त्यांनी तात्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली. परंतु, वेळेवर येतील ते पोलीस कुठले. तब्बल साडे चार तासांनी पोलीस या ठिकाणी आले. त्यानंतर या बाळाला पोलिसांनी ताब्यात घेतले. थंडीचे दिवस असल्यामुळे या पिशवीत ठेवलेले बाळ गारठून गेले होते. पोलीस आल्यानंतर या दोघांनी या बाळाला एका रुग्णालयात दाखल केले.

मात्र बाळाचे नशीब बलवत्तर म्हणून त्यांच्या मदतीला तेजस आणि सुहास धाऊन आले. या दोघांनी दाखवलेल्या प्रसंगाधावनतेमुळे या बाळाचे प्राण वाचले आहेत. सध्या खाजगी रुग्णालयात या बाळावर उपचार सुरू असून बाळ सुखरूप आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा