आभाळाचे स्वप्न दाखवणारी ऍकॅडमी

April 26, 2010 1:48 PM0 commentsViews: 5

26 एप्रिल

प्राची कुलकर्णी, पुणे

मिग 21 मधील दोषांमुळे पुण्यातील अभिजीत गाडगीळांना हौतात्म्य पत्करावे लागले. पण ठपका ठेवण्यात आला, अभिजीतच्या कौशल्यावर…खरे तर पूर्ण कोसळून जावे असा क्षण…पण अभिजीतच्या आई वडिलांनी खचून न जाता मोठा लढा दिला.

ते एवढ्यावरच थांबले नाहीत. तर अभिजीतसारखे वैमानिक होण्याचे स्वप्न पाहणार्‍यांसाठी त्यांनी 'जीत' नावाने एक ऍकॅडमी सुरू केली. आणि आताअभिजीतच्या वाढदिवसालाच या ऍकॅडमीत एक मिग 21 विमानही दाखल झाले आहे…

अभिजीतच्या मृत्यूनंतर 8 वर्षांच्या लढ्यानंतर कविता गाडगिळांनी या अपघातातील मिग विमानाचे दोष सिद्ध केले. पण त्या एवढय्‌ावरच थांबल्या नाहीत. अभिजीतसारखेच पायलट होण्याचे स्वप्न रंगवणार्‍यांसाठी त्यांनी स्थापन केली जीत ट्रेनिंग ऍकॅडमी.

इथे सिम्युलेटरच्या माध्यमातून कॅप्टन अनिल गाडगीळांनी मुलांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. त्यातच उड्डाण आयुष्य संपलेली विमाने फ्लाईंग इन्स्टिट्यूट्सना देत असल्याची माहिती कविता गाडगीळांना कळली. आणि त्यांनी नवा ध्यास घेतला. ऍकॅडेमीत मिग विमान आणण्याचा.पाच-सहा वर्षांच्या खटाटोपानंतर हे विमान ऍकॅडमीमध्ये दाखल झाले.

जीत ऍकॅडमीमध्ये ट्रनिंग घेण्यासाठी येणार्‍या मुलांना या विमानापासून प्रेरणा मिळेल, असा विश्वास कविता गाडगीळ यांना वाटत आहे.

ऍकॅडमीत शिकणार्‍या मुलांच्या डोळ्यात कविता गाडगीळांना अभिजीतची स्वप्ने दिसतात. आणि ती साकार करण्यासाठी त्या जोमाने कामाला लागतात.

close