‘कम्पॅशन इंटरनॅशनल’ला निधी देण्याचा केद्राकडून हिरवा कंदील

October 18, 2016 10:12 PM0 commentsViews:

compassion international18 ऑक्टोबर : केंद्र सरकारनं कम्पॅशन इंटरनॅशनल या अमेरिकी एनजीओला भारतामधील एनजीओंना निधी वितरीत करायची परवानगी दिली आहे. ‘द हिंदू’ या वर्तमानपत्रानं हे वृत्त प्रसिद्ध केलंय. विशेष म्हणजे ही एनजीओ भारतामध्ये धर्मपरिवर्तन करणाऱ्या भारतीय एनजीओंना निधी पुरवते, असा ठपका सुरक्षा यंत्रणांनी ठेवल्यामुळे केंद्र सरकारनं ही एनजीओ वॉचलिस्टमध्ये होती, म्हणजेच त्यांच्या कारभारावर केंद्र सरकारचं लक्ष होतं.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी या एनजीओला भारतामध्ये मिळणाऱ्या वागणुकीबद्दल सुषमा स्वराज यांच्याकडे चिंता व्यक्त केल्यानंतर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय, हे महत्त्वाचं. मिळालेल्या माहितीनुसार, कम्पॅशन इंटरनॅशनलनं भारतामधल्या 250 एनजीओंना निधी पुरवण्याची इच्छा व्यक्त केली होती. यापैकी अनेक एनजीओ या ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराचं काम करत असल्याचं उघड झालंय.

मे 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर एनडीए सरकारने परदेशी निधी नियंत्रण कायदा, म्हणजेच FCRA अंतर्गत 10 हजारांपेक्षा जास्त एनजीओंविरोधात कारवाई केली होती. या एनजीओ भारताच्या विकासात अडथळे आणत असल्याचा दावा केंद्र सरकारतर्फे करण्यात आला होता. या निर्णयाचा फटका ग्रीनपीस, फोर्ड फाउंडेशन अशा प्रतिष्ठीत आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेल्या एनजीओंनाही बसला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close