मराठवाड्यात काविळीची साथ

April 26, 2010 3:23 PM0 commentsViews: 1

26 एप्रिल

मराठवाडयात लातूर आणि नांदेड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये काविळीची साथ पसरली आहे.

अहमदपूर तालुक्यात शिवनखेड या छोट्याशा गावात उपचारासाठी रोज पाचशेहून अधिक पेशंट उपचारासाठी रांगा लावत आहेत.

इतक्या मोठ्या संख्येने पेशंट येत असताना आरोग्य खात्याला त्याची खबरही नाही.

शिवनखेड गावात भर उन्हात पेशंट एका खाजगी दवाखान्यासमोर रांगेत उभे असतात. या दवाखान्यात काविळीवर गावठी उपचार केला जातो.

पाणीटंचाईने हैराण झालेल्या गावकर्‍यांना आता दूषित पाण्यातून पसरलेल्या काविळीच्या साथीने हैराण केले आहे.

close