किचनमधले खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी काय कराल?

October 18, 2016 11:56 PM0 commentsViews:

स्वयंपाकघर…किचन.. प्रत्येक घरातली महत्त्वाची जागा. आपल्याला हव्या असलेल्या भाज्या, धान्य, खाद्यपदार्थ यांची काळजी कशी घ्यायची याच्या काही टीप्स…

1. कच्ची केळी ,फणस,सुरण आणि इतर कंदमुळे कापण्याआधी किंवा सोलण्याआधी हाताला आणि विळीला थोडं तेल लावावं. त्यामुळे हाताला चिकटपणा किंवा खाज येत नाही.

2. फ्लॉवरमध्ये कीड असेल तर ते मीठाच्या पाण्यात ठेवावं, त्यातून किडी स्वत:हून बाहेर येतील.

3. फ्रीजला कोणत्याही पदार्थांचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत,त्यामुळे दुर्गंध निघून जाईल.

4. तांदुळ आणि गव्हाच्या पोत्यात चुन्याचा चुरा कपड्यात बांधून ठेवावा,त्याने कीड नाही लागत आणि कोरडेपणा राहतो.चुन्याऐवजी लाल मिरच्याही ठेवता येतील.

5. धान्य किंवा डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यांत कडुनिंबाचा पाला सुकवून ठेवावा.त्यामुळे तिथे कीड लागत नाही.
 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा