वागळे इस्टेटमधील आग विझली

April 26, 2010 3:41 PM0 commentsViews: 10

26 एप्रिल

ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील विद्युत मेटालिक कंपनीला लागलेली आग 12 तासांच्या प्रयत्नानंतर विझली आहे.

ठाणे अग्निशमन दलाचे सुमारे 20 बंबांनी ही आग आटोक्यात आणली. आगीची तीव्रता जास्त असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी एवढा वेळ लागल्याचे अग्निशमन अधिकार्‍यांनी सांगितले.

आग विझवण्यासाठी भिवंडी आणि मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलांचीही मदत घेण्यात आली.

दक्षता म्हणून रात्री पोलिसांनी परिसरातील 500 कुटुंबांना हलवले होते. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

close