एसबीआयकडून 6 लाख ग्राहकांचे डेबिट कार्ड ब्लॉक

October 19, 2016 8:43 AM0 commentsViews:

atm_625x300_71415526128

19 ऑक्टोबर :  ऐन सणासुदीच्या तोंडावर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवळपास सहा लाख ग्राहकांची डेबिट कार्ड्स ब्लॉक करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे कुठलीही पूर्वसूचना न देता कार्ड्स ब्लॉक झाल्याने ग्राहकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. एसबीआयच्या सिस्टीममध्ये व्हायरस घुसल्याच्या भितीने एसबीआयकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांत देशभरातून अन्य बँकांच्या एटीएममध्ये डेबिट कार्ड वापरल्यानंतर चुकीचे व्यवहार होत असल्याच्या तक्रारी एसबीआयकडे येत होत्या. एसबीआयने यासाठी सायबर क्राईम क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेतला. तज्ज्ञांच्या मते या अन्य बँकांच्या एटीएममधून या डेबिट कार्डांमध्ये व्हायरस शिरला असावा. त्यामुळे या कार्डांचा वापर करणे तात्काळ बंद करणे श्रेयस्कर ठरेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं होतं.

एसबीआयकडून जूलै महिन्याच्या अखेरीपर्यंत २० कोटी २७ लाख डेबिट कार्ड वितरीत करण्यात आली होती. त्यापैकी २५ टक्के म्हणजे तब्बल पाच लाख कार्ड बंद करण्यात आली आहेत.

दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर कुठलीही पूर्वसूचना न देता कार्ड्स अचानक ब्लॉक झाल्यामुळे कार्डहोल्डर हैराण झाले. त्यानंतर बँकेकडून ईमेल आणि एसएमएस पाठवण्यात आले. संबंधित ग्राहकांना नवीन डेबिट कार्ड्स दिली जातील. त्यासाठी आपापल्या ब्रँचमध्ये नव्या कार्डसाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भारतीय बँकिंगच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कार्ड रिप्लेसमेंट मानली जात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा