चिरायू अमिन नवे कमिशनर

April 26, 2010 5:23 PM0 commentsViews: 4

26 एप्रिल

चिरायू अमिन हे आयपीएलचे नवे अंतरिम कमिशनर झाले आहेत. अमिन बडोदा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि अलेम्बिक इंडिया कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.

नवीन अंतरिम कमिशनरची नेमणूक करताना नवीन अंतरिम समितीची स्थापना मात्र करण्यात आलेली नाही. आयपीएलच्या या गव्हर्निंग कौन्सिलच्या मीटिंगला शशांक मनोहर, रत्नाकर शेट्टी, आयएस बिंद्रा, रवी शास्त्री, सुनील गावस्करही उपस्थित होते.

ललित मोदी यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यावर बीसीसीआयने चिरायू अमिन यांची आयपीएलचे हंगामी कमिशनर म्हणून नियुक्ती केली आहे. अमिन काँग्रेसच्या काही नेत्यांचे जवळचे मित्र मानले जातात.

दरम्यान, आयपीएलच्या कमिशनरपदी मी अजूनही कायम आहे…माझे फक्त निलंबनच झाले आहे… ही प्रतिक्रिया आहे, ललित मोदींची. आणि तीही पुन्हा आहे, ट्विटरवर…शिवाय ही तर केवळ सुरुवात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

मी अजूनही आयपीएलचा कमिशनर आहे, असा दावा मोदींनी ट्विटरवर केला आहे. आणि सर्व पाठीराख्यांचे आभार मानले आहेत.

बीसीसीआयला आव्हान देण्यासाठी ललित मोदी दिग्गज वकिलांशी चर्चा करत असल्याचे समजते.

close