‘डियर जिंदगी’,’कहानी 2’चं पोस्टर लाँच, प्रमोशनसाठी सिनेमे सरसावले

October 19, 2016 12:16 PM0 commentsViews:

Poster Realase2133

19 ऑक्टोबर: हल्ली सिनेमांची प्रमोशन्स अगदी पद्धतशीरपणे केली जातात. सिनेमांच्या ट्रेलरआधी सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं जातं. शाहरूख खान आणि गौरी शिंदे यांचा ‘डियर जिंदगी’ या सिनेमाचं पोस्टर रिलीज केलंय. तर विद्या बालनच्या कहानी 2चंही पोस्टर लाँच झालंय. आमिर खानच्या दंगल सिनेमाचं पोस्टर ट्विट करून त्यावर ट्रेलर रिलीजची डेट टाकलीय. त्यामुळे सध्या पोस्टर्सची दिवाळी आहे.

Dear zindagi123 ‘डियर जिंदगी’ हा सिनेमा दिग्दर्शित केलाय ‘इंग्लिश विंग्लिश’ची दिग्दर्शिका गौरी शिंदेनं. तर करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तो रिलीज होतोय. पोस्टरवर शाहरूख आणि आलियाची जोडी एकदम फ्रेश वाटतेय. 25 नोव्हेंबरला सिनेमा रिलीज होतोय.

KAHANI 2 Newew

कहानी 2 हा सिनेमा कहानीचा सिक्वल. दिग्दर्शक सुजॉय घोषनं ट्विटरवर सिनेमाचं पोस्टर टाकलंय. पोस्टरवर विद्या बालन साध्या लूकमध्ये आहे. पण ती एक गुन्हेगार आहे. आणि तिचा तपास सुरू आहे. विद्यावर खून आणि अपहरणाचा आरोप आहे. पोस्टरवर विद्याची उंची, रंग, नाव याचं वर्णन आहे. सिनेमात तिचं नाव आहे राणी सिंग. कहानी सिनेमा हिट झाला होता. त्यामुळे कहानी 2ची उत्सुकता आहे. 2 डिसेंबर 2016ला कहानी 2 रिलीज होईल.

Dangal PIC

दंगल सिनेमाच्या प्रमोशनची वेगळी आयडिया केलीय. दंगलचं पोस्टर ट्विट करून त्यावर 20 ऑक्टोबरला ट्रेलर येतंय असं म्हटलंय. दंगलमधल्या पहलवान आमिर खानबद्दलही भरपूर उत्सुकता आहे. सिनेमा 23 डिसेंबरला रिलीज होतोय.

पोस्टर्स अगोदर रिलीज करून निर्माते प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता चांगलीच वाढवतात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा