कृष्णा पाणीवाटपाबाबत महाराष्ट्र सरकारला दिलासा

October 19, 2016 2:19 PM0 commentsViews:

Krishma River24312

19 ऑक्टोबर : कृष्णा नदीच्या पाणीवाटपासंदर्भात झालेल्या निर्णयामुळे आज (बुधवारी) राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. कृष्णा नदीच्या पाणीवाटपासंदर्भातील तिढा सोडवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लवादाने हा निर्णय दिला आहे. यावेळी लवादाने महाराष्ट्र आणि कर्नाटकची बाजू उचलून धरली. या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी इतर राज्यांना द्यायला लावदाने ठाम नकार दिला आहे. एवढंच नाही तर तेलंगणाला आंध्र प्रदेशच्या वाट्याचं 1005 टीएमसी पाणी देण्याचे आदेशही लवादाने दिले आहेत.

तेलंगणा या नव्या राज्याच्या निर्मितीमुळे कृष्णा खोऱ्याच्या पाण्याचे चार राज्यामध्ये फेरवाटप होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात पाणी वाटप कशाप्रकारे व्हावं याबद्दलचा हा वाद होता. पण या वादात महाराष्ट्राला ओढण्यात आलं होतं. मात्र आंध्र-तेलंगणाच्याच पाणी वाटपाचा वाद आहे, तर प्रकल्पानुसार विभागणी करा, त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही अशी भूमिका महाराष्ट्र सरकारने मांडली. महाराष्ट्राच्या भूमिकेमुळे तेलंगणावर अन्याय होत असल्याचा दावा तेलंगणाच्या वकिलांनी केला होता. मात्र केंद्रीय जल आयोगाने हा दावा फेटाळून लावत तेलंगणासाठी आंध्राच्या कोट्यातूनच पाणी द्यावं असे आदेश दिले. त्यामुळे महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा