दारुड्याने पाचजणींना जाळले

April 27, 2010 8:47 AM0 commentsViews: 3

29 एप्रिल

दारुच्या नशेत एकाने पत्नीसह पाचजणींना जिवंत जाळल्याची घटना टिटवाळ्यात घडली आहे.

टिटवाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील म्हारळ गावात हा प्रकार घडला.

तुळशीराम पांडव याने दारूच्या नशेत आपली पत्नी आशा, मुली सोनी (वय 17), राणी (वय 15), किरण (वय 14) आणि भाची कविता (वय 12) या पाच जणींना पेटवून दिले.

या पाचही जणी 80 टक्के भाजल्या आहेत. त्यांना उल्हासनगरमधील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या प्रकारानंतर तुळशीराम पांडव फरार झाला आहे.

पत्नीवर असलेल्या चारित्र्याच्या संशयातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

close