गोंदियात प्रेमी युगलाची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या

October 19, 2016 6:06 PM0 commentsViews:

gondiya23423गोंदिया,19 ऑक्टोबर: प्रेमी युगलाने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इंजिनिअरींगची विद्यार्थिनी असलेल्या काजल मेश्राम आणि आकांत वैद्य अशी मृतांची नावे आहेत.

काजल आणि आकांत एकमेकांवर प्रेम करत होते. मंगळवार संध्याकाळपासून ते बेपत्ता होते. आज सकाळी शहरातील धिवारी शिवाराजवळ काजल आणि आकांत यांचे मृतदेह सापडले. मृतदेहाजवळ एक देशी कट्टाही सापडला आहे. याच कट्‌ट्याने या दोघांनी आत्महत्या केली. मृतदेहजवळ पोलिसांनी एक सुसाईड नोटही सापडली आहे. गोंदिया पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा