तरुणींवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करणाऱ्या चहावाल्याला मॉडेलिंगची ऑफर

October 19, 2016 5:59 PM0 commentsViews:

chahwala

 

19 ऑक्टोबर: मिका सिंगचं ‘ब्लू आईज हिप्नोटाईज तेरी करदी ऐ मेनू’ हे गाणं आजवर अनेक तरूणांनी मुलींना बघून गायलं असेलं. पण पाकिस्तानमधल्या निळ्या डोळ्यांचा एक चहावाला सध्या सोशल मीडियावर अनेक तरूणींना हिप्नोटाईज केलं आहे. सोशल मीडियावर स्टार झाल्यावर या अर्शदला आता मॉडेलिंगचीही ऑफर मिळाली आहे.

‘अर्शद खान’ असं या चहावाल्याचं नावं असून तो फक्त 18 वर्षांचा आहे. इस्लामाबादच्या एका ऑनलाईन शॉपिंग सेंटरच्या व्यापाऱ्याने अर्शदचे फोटोही पोस्ट केलं आहेत. तो आपल्या ब्रॅंडसाठी मॉडेलिंग करेल असं जाहीरही करुन टाकले आहे.

अर्शदचा व्हायरल झालेला हा फोटो पाहून तो एक ‘चहावाला’ आहे, यावर कुणाचाच विश्वासच बसत नाही. अर्शदच्या निळ्या रंगाच्या डोळ्यांनी पाकिस्तानीच नव्हे तर भारतीय तरुणींनाही ‘हिप्नोटाईज’ केली आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर तर #chaiwala असा ट्रेंडिंगला होता. जिया अलीच्या अकाऊंटवरुन सर्वात आधी या चहावाल्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यानंतर या फोटोला लाईक आणि शेअरचा अक्षरश: महापूर आला.

close