‘पुणे मेट्रो’च्या मार्गात नगरसेवकांचा खोडा !

October 19, 2016 6:28 PM0 commentsViews:

pune metro 3419 ऑक्टोबर : पुणे मेट्रो प्रकल्प मार्गी लागण्याची काही चिन्हं दिसत नाहीयेत. पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रोला द्यायला पुण्याच्या नगरसेवकांनी विरोध केलाय. यावरून पुणे महापालिकेची सभाही तहकूब करण्यात आली. पुणे मेट्रो कॉर्पोरेशन असताना हे काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला का देता, असा या नगरसेवकांचा सवाल आहे.

मागील आठवड्यातच पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडच्या मेट्रो प्रकल्पाला पीआयबी अर्थात सार्वजनिक गुंतवणूक बोर्डाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंदीय मंत्रिमंडळाकडे पाठवला जाईल. राज्यातील सर्वात जास्त काळ रखडलेला पुणे मेट्रोचा प्रकल्प अखेर मार्गी लागला असं चित्र जवळपास स्पष्ट झालं. मेट्रो भुयारी की जमिनीवरील तसंच यामुळे होणारी पर्यावरण हानी अशा अनेक वादांमुळे पुण्याची मेट्रो रखडली होती.  पुणे मेट्रोच्या या प्रकल्पाचा 20 टक्के खर्च केंद्र सरकार, 20 टक्के राज्य सरकार, 10 टक्के पुणे महानगरपालिका, आणि 50 टक्के कर्ज अशी खर्चाची विभागणी केली जाणार आहे. राज्य सरकारने पुणे मेट्रोचं नागपूर मेट्रोकडे सोपावलं आहे. पण आता याच मुद्दावरून नगरसेवकांनी आक्षेप घेतलाय. नागपूर मेट्रो काॅर्पोरेशनला काम देऊ नका असा सूरच लगावलाय.

पुणे मेट्रो प्रकल्प
– एकूण खर्च 12 हजार 298 कोटी रु.
- आशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचं कर्ज – 6 हजार 325 कोटी रु.
– जागतिक बँकेचं कर्ज – 2200 कोटी रु.
– पिंपरी चिंचवड महापालिका 1230 कोटी रु. निधी देणार

अशी असेल पुणे मेट्रो
– मेट्रोचे 2 कॉरिडर
– मेट्रोचा एकूण मार्ग 43 किमी
– 16 किमीपैकी 5 किमी अंडरग्राउंड मेट्रो

- पिंपरी ते स्वारगेट – 16 किमी
– यापैकी 5 किमीचा भुयारी मार्ग
– 11 किमीचा एलिव्हेटेड मार्ग
– 15 स्टेशन्सपैकी मेट्रो 6 स्टेशन भुयारी
- 9 स्टेशन एलिव्हेटेड

पिंपरी ते स्वारगेट मेट्रोची स्थानकं
नगर, भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी, रेंज हिल्स शिवाजीनगर, पुणे महापालिका भवन, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट

अशी असेल पुणे मेट्रो
वनाज ते रामवाडी – 14 किमी
हा मार्ग पूर्णपणे एलिव्हेटेड

वनाज ते रामवाडी मेट्रोची स्थानकं
वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप, गरवारे कॉलेज, डेक्कन, संभाजी पार्क, पुणे महापालिका भवन, शिवाजीनगर न्यायालय, मंगळवार पेठ, पुणे रेल्वे स्टेशन, रुबी हॉस्पिटल, बंड गार्डन, येरवडा, कल्याणीनगर, रामवाडी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close