14 फुटांवरच्या झोपड्या तोडू नका, शिवसेनेचा विरोध

October 19, 2016 7:37 PM0 commentsViews:

mumbai_slums19 ऑक्टोबर : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा झोपड्‌ड्यांवरुन राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे. 14 फुटांच्या वरच्या झोपड्या तोडण्याच्या शासनाच्याआदेशानुसार पालिका आयुक्तांनी कारवाई सुरू करताच कालपर्यंत अनधिकृत बांधकाम तोडण्याची मागणी करणारे पक्ष आता त्यांना संरक्षण देण्याची मागणी करत आहेत.
ग्राऊंड + वनचे बांधकाम तोडू नये अशी मागणी सेनेनं केली आहे. तर भाजप आणि मनसेनं त्याला विरोध केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेही 20 फुटापर्यंत संरक्षण द्या अशी मागणी केली आहे.

मुंबईत 14 फुट उंच असलेल्या झोपड्यांवर कारवाईला शिवसेनेनं विरोध केलाय. मुख्य बाब म्हणजे यापूर्वी शिवसेनेनंच बहुमजली झोपड्या पाडण्याची भूमिका घेतली होती. त्या भूमिकेवरुन शिवसेनेनं घूमजाव केलंय. मुंबईत अनेक ठिकाणी बहुमजली झोपड्या आहेत. या झोपड्या पाडण्याची मागणी शिवसेनेनं केली होती. मुंबई महापालिकेनंही या झोपड्या तोडण्याची तयारी केली होती. महापालिकेनं बहुमजली झोपड्यांना नोटीसाही बजावल्यात. पण आता शिवसेनेनं बहुमजली झोपड्या तोडू नका असा पवित्रा घेतलाय. भाजप आणि मनसेनं त्याला विरोध केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेही 20 फुटापर्यंत संरक्षण द्या अशी मागणी केली आहे. समाजवादी पक्षाने या संपूर्ण कारवाईलाच विरोध केला आहे. एकूणच काही महिन्यांवर आलेल्या निवडणूकीला पाहाता अनेक पक्ष सावधता बाळगताना दिसताहेत. आणि आयुक्तांनी मात्र निर्णय मुख्यमंत्र्यांवर सोडलाय. तोपर्यंत ग्राऊंड + वनवर कारवाई करणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close